मुंबई: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित ३ हजार रुपये देण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता २४ ते ३० एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

 

मात्र, या वर्षी काही महिला योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत, असे सरकारी नियमांनुसार नमूद करण्यात आले आहे. आता यावेळी किती लाडक्या बहिणी अपात्र होणार याची धाकधूक बऱ्याच बहिणींना लागली आहे.

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग महिला स्वत:च्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी करू शकतात. पात्र महिलांनी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची नोंद घ्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!