मुंबई: Gmail वापरकर्त्यांसाठी जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यामुळे तब्बल 2.5 अब्ज म्हणजेच 250 कोटींहून अधिक Gmail अकाउंट्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर Googleने तातडीने युजर्सना इशारा दिला असून पासवर्ड बदलण्याचे आणि अतिरिक्त सुरक्षा उपाय वापरण्याचे आवाहन केले आहे.

 

हा हल्ला प्रामुख्याने Salesforce क्लाऊड डेटाबेसमधून झाल्याचे उघड झाले आहे. नामांकित हॅकिंग गट ‘ShinyHunters’ यामागे असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांनी सोशल इंजिनीयरिंग आणि खोटे फोन कॉल्स (vishing) च्या माध्यमातून Googleच्या सिस्टीममध्ये प्रवेश मिळवला आणि प्रचंड प्रमाणात डेटा चोरी केला.

 

लीक झालेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांचे ईमेल आयडी, संपर्क तपशील आणि व्यवसाय संबंधी माहिती सामील असल्याचे सांगितले जात आहे. जरी पासवर्ड्स चोरीला गेले नसले तरी तज्ज्ञांच्या मते हा डेटा फिशिंग आणि खोटे कॉल करून लोकांना फसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ शकतो. विशेषतः अमेरिकेत ‘650’ कोडने सुरू होणारे फोन कॉल्स येत असून, ते Google सपोर्टच्या नावाखाली पासवर्ड किंवा OTP मागतात.

 

Googleने जगभरातील सर्व प्रभावित वापरकर्त्यांना अधिकृत ईमेल पाठवले असून, त्यामध्ये ताबडतोब पासवर्ड बदलणे, द्वि-घटक प्रमाणीकरण (2FA) सुरू करणे आणि पासकी (passkeys) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, संशयास्पद कॉल्स आणि ईमेल्सकडे दुर्लक्ष करावे व Google Security Checkup टूलचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

 

सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा हल्ला इतिहासातील Gmail युजर्सवरील सर्वात मोठा डेटा उल्लंघन प्रकार आहे. त्यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांनी अधिक सावध राहणे आणि आपले खाते सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

 

⚠️ थोडक्यात :

2.5 अब्ज Gmail अकाउंट्सवर परिणाम.

डेटा चोरी ‘ShinyHunters’ गटाकडून.

पासवर्ड्स नाहीत पण संपर्क माहिती लीक.

Googleने पासवर्ड बदलण्याचे व 2FA सुरू करण्याचे आवाहन केले.

 

 

By admin

One thought on “Gmail वर झाला इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!