मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.
नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. गुजरातमधील गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी पंतप्रधान मोदींसह त्यांच्या भावांनी हिराबेन यांना अखेरचा निरोप दिला. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
