दिल्ली: नवीन वर्षात तुम्हाला झटका बसण्याची शक्यता आहे. कारण मोबाईल रिचार्ज महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस IIFL सिक्युरिटीजने सांगितले की, नजीकच्याका ळात 5G शी संबंधित प्रति युजर सरासरी महसूल, उत्पन्न वाढवणे कठीण आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडे 4G चे टॅरिफ वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. वोडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ कंपन्या मोबाइल टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे.
