दिल्ली: अंजली सिंग या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. कारखाली अडकल्यामुळे अंजलीच्या डोक्याचे काही भाग गायब झाले आहेत. तिची फुफ्फुसेही बाहेर आली होती.
अति रक्तस्राव व शरीरातील हाडांना गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. अंजली कारखाली अडकल्यानंतर 12 किमी दूर पर्यंत तिला कारने फरफटत नेले त्यात तिचा मृत्यू झाला होता.
