नवी दिल्ली : विनेश फोगटला भारताची ‘गोर्ल्डन गर्ल’ विनेश फोगटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर आपले कसे शोषण झाले आणि त्यामुळे मला रोज आत्महत्या कराविशी वाटायची, असे धक्कादायक वक्तव्य विनेशने केले आहे. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खेळाडूंबरोबर ते जेव्हा हॉटेलमध्ये राहायचे तेव्हा नेमकं काय घडायचं, हे सत्यदेखील तिने आता सर्वांसमोर सांगितले आहे.

भारताचा तिरंगा घेऊन जे खेळाडू देशाची शान वाढवतात त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कारण ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आता दाद मागायचे ठरवले आहे. त्यासाठी ब्रिजभूषण सिंग हॉटेलच्या रुममध्ये नेमकं काय करायचे आणि त्यांनी आपले कसे शोषण केले, याबाबतची माहिती विनेशने आता दिली आहे.

विनेशने सांगितले की, ” जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, तेव्हा ब्रिजभूषण हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे. ही नियमांच्या विरोधात आहे. ब्रिजभूषण फक्त एवढेच करायचे नाहीत तर ते महिला खेळाडूंच्या मजल्यावरच आपली रुम बूक करायचे. त्यानंतर जाणून बुजून ते आपल्या रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे. जेव्हा माझा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव झाला तेव्हा त्यांनी मला तुझं नाणं खोटं आहे, असं सांगितलं होतं. त्याचबरोबर माझा मानसीक छळही केला. त्यामुळे माझ्या मनात प्रत्येक दिवशी आत्महत्या करण्याचा विचार येत होता. माझी हत्यादेखील होऊ शकते. जर माझी हत्या झाली तर त्यासाठी ब्रिजभूषण यांनाच जबाबदार धरावे.”

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!