मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांचे मुंबईतील निवासस्थानी आज शांतपणे निधन झाले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर येताच संपूर्ण बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली आहे.

 

धर्मेंद्र यांना मागील काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रास होत असल्याने त्यांच्यावर Breach Candy रुग्णालयात उपचार सुरू होते. काही काळ तब्येत सुधारल्याचे वृत्त असले तरी पुन्हा प्रकृती खालावल्याने आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी उसळली. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांना सांत्वन दिले. सोशल मीडियावरही श्रद्धांजलींचा वर्षाव होत असून ‘एंड ऑफ ॲक्शन एरा’ अशी भावना व्यक्त केली जात आहे.

 

धर्मेंद्र यांनी सहा दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. शोले, सीता और गीता, दोस्त, चुपके चुपके, पत्थर के फूल अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. देखणे व्यक्तिमत्व, दमदार संवादफेक, ॲक्शन आणि रोमान्स या सर्व गोष्टींमुळे ते पिढ्यान्‌पिढ्यांचे लाडके ठरले.

 

दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून कुटुंबीय, बॉलिवूड कलाकार, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

 

भारतीय चित्रपट इतिहासात अनमोल ठसा उमटवणारा हा बहुमोल तारा आज मावळला असला, तरी त्यांची कामगिरी आणि आठवणी कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!