नागपूर: येथील महानगरपालिकेने (मनपा) संजय बाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या व नागपूर दंगलीतील कथित प्रमुख आरोपी असणाऱ्या फहीम खानच्या अनाधिकृत घरावर बुलडोझर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खानच्या 900 चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले. मनपाने याआधीच या बांधकामाला नोटीस जारी केली होती.
कारवाईदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त उभारला होता. या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण विरोधातील मनपाच्या कठोर भूमिकेची पुन्हा एकदा नोंद झाली आहे.
फहीम खान याच्या घराचे बांधकाम अतिक्रमित असल्याचे मनपाच्या सर्वेक्षणात समोर आले होते, त्यानुसार योग्य प्रक्रिया अवलंबून ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अतिक्रमण विरोधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नाही आणि या संदर्भात कठोर पावले उचलली जातील.
या प्रकरणाने शहरातील अतिक्रमण विरोधातील मनपाच्या कार्यवाहीची चर्चा पुन्हा एकदा वाढवली आहे.
