छ. संभाजी नगर: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे (शर्मा) यांना देखभालीचा खर्च (maintenance) देण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतरिम आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी आज (शनिवार, २३ मार्च) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली, जिथे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्याशी झालेल्या लग्नाच्या अधिकृततेवरच प्रश्नचिन्ह उठवले.

 

“लग्नच झाले नव्हते!” : मुंडे वकिलांचा दावा

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटले की, “धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी कधीच अधिकृत लग्न केले नव्हते. त्यामुळे, त्या त्यांच्या पत्नी म्हणून पोटगी मागू शकत नाहीत.” यावेळी न्यायाधीशांनी करुणा शर्मा यांच्या वकिलांना “अधिकृत लग्नाचा पुरावा आहे का?” असा प्रश्न विचारला. करुणा शर्मा यांच्या वकिलांनी यावेळी पुरावे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला.

 

“मुलांची आई नाही, पण मुलं तुमची?” : न्यायालयाचा तगडा प्रश्न

धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या युक्तिवादावर न्यायाधीशांनी तडकाफडकी प्रतिप्रश्न केला— “जर करुणा शर्मा यांच्याशी लग्न झालेच नसेल, तर त्यांच्या दोन मुलांचे वडील धनंजय मुंडे कसे? मुलांना त्यांनी स्वीकारले आहे, पण आईला नाकारता येणार नाही!” यावर मुंडे यांचे वकील म्हणाले, “मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारले आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी कधीच पती-पत्नीसंबंध नव्हते. त्यांचे नाते अधिकृत लग्नातून बंधलेले नाही.”

 

“१५ लाख इनकम असूनही पोटगी का?” : मुंडे वकिलांचा आर्थिक युक्तिवाद

यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्या वार्षिक १५ लाख रुपये इनकमचा मुद्दा मांडला. वकिलांचा दावा होता की, “करुणा शर्मा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, इनकमटॅक्स भरतात, तरीही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे.”

 

पुढील सुनावणी ५ एप्रिलला, करुणा शर्मांना पुरावे सादर करायचा मोका

न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना लग्नाचे पुरावे सादर करण्यासाठी वेळ दिला आहे. पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार असून, यावेळी करुणा शर्मा यांच्या वकिलांनी अधिकृत दस्तऐवज सादर करण्याची शक्यता आहे.

 

प्रकरणाची पार्श्वभूमी

या आधी, करुणा मुंडे (शर्मा) यांनी धनंजय मुंडे यांविरुद्ध देखभालीच्या खर्चासाठी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यावरून अंतरिम आदेश देताना धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा आणि मुलांसाठी मासिक पोटगी भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!