मुंबई: ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या लोकप्रिय मराठी कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे यांना सायबर गुन्हेगारांनी फसवून ६१ लाख ८३ हजार रुपये बळकावले. फक्त दीडशे रुपयांच्या प्रलोभनात सापडून सागरला हा भरीव आर्थिक धक्का बसला आहे.

 

नेमकं काय घडलं?

फेब्रुवारीमध्ये सागर कारंडे यांच्या व्हॉट्सअपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. त्यात “इन्स्टाग्राम पोस्टला लाईक करा, दर लाईकला १५० रुपये मिळतील” अशी ऑफर होती. या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे, दररोज काही लाईक्स करून महिन्याला सहा हजार रुपये कमवता येतील, असे सांगण्यात आले होते. हे काम सोपे वाटल्याने सागरने त्याला सुरुवात केली.

 

पैसे गुंतवण्याची सुरुवात

सुरुवातीला त्यांना एका डिजिटल वॉलेटमध्ये काही रक्कम भरावी लागली. “हे पैसे तुमच्याच वॉलेटमध्ये असतील, फक्त कमिशनसाठी लागतात” असे सांगितल्याने सागरने २७ लाख रुपये गुंतवले. नंतर त्यांना १९ लाख रुपये आणि ३०% टॅक्स म्हणून अतिरिक्त रक्कम भरावी लागली. एकूण ६१ लाख ८३ हजार रुपये भरल्यानंतरही, “टॅक्स चुकीच्या खात्यात गेला” असे सांगून त्यांना पुन्हा पैसे मागण्यात आले. तेव्हा सागरच्या लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे.

खरंच फसवणूक झाली आहे का हे अजूनही सागर कारंडे यांच्याकडून समजले नाही पण अशा प्रकारच्या फसवणुकीतून आपण नक्कीच सावध राहण्याची गरज आहे.

 

सायबर पोलिसांकडे तक्रार

या घटनेनंतर सागर कारंडे यांनी मुंबई सायबर पोलिस (उत्तर विभाग) येथे तक्रार केली आहे. पोलिस सध्या या फसवणुकीच्या ट्रान्झॅक्शनचा आणि सायबर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत असे समजले आहे.

 

सायबर सुरक्षेचे धोरण

ही घटना घडली असेल किंवा नसेल पण पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणुकीविषयी जागरूकता निर्माण करते. सायबर गुन्हेगार सहसा “घरबसल्या पैसे कमवा” यासारख्या प्रलोभनांमधून बळी पाडतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,

– अनोळखी ऑफरवर विश्वास ठेवू नका.

– कोणत्याही ट्रान्झॅक्शनपूर्वी बँक किंवा सायबर विशेषज्ञांचा सल्ला घ्या.

– अधिकृत प्लॅटफॉर्मवरच व्यवहार करा.

 

सागर कारंडे यांच्या या अनुभवाने सर्वांनी सावध राहण्याची गरज भासवली आहे. आता पोलिस या गुन्ह्याच्या तपासात आहेत आणि फसवणार्यांना न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!