कराड : कराड बार असोसिएशनच्या सन २०२६–२०२७ या वर्षासाठी झालेल्या वार्षिक निवडणुकीत ॲड. दीपक दिनकर थोरात यांनी २१६ मते मिळवत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होऊन इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे आणि सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मान मिळवणारे ते पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.

 

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲड. अमोल प्रल्हाद कणसे, सचिवपदी ॲड. मयूर मधुकर माने, सहसचिवपदी ॲड. राजवर्धन प्रमोद पाटील तर महिला प्रतिनिधी ॲड. दिव्या दीपक म्होप्रेकर यांची निवड झाली. तसेच खजिनदारपदी ॲड. ज्योती दीपक मोहिरे यांची निवड झाली असून लॉ लायब्ररी खजिनदारपदी ॲड. रोहित संजय माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

कामगिरीमुळे मिळाली पुन्हा संधी

ॲड. दीपक थोरात यांनी २०२५–२०२६ या पहिल्या कार्यकाळात केलेल्या प्रभावी कामगिरीमुळेच त्यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी सदस्यांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले तसेच बार असोसिएशनच्या विकासाला गती मिळाली.

 

कार्यकाळातील ठळक कामगिरी

सहकार न्यायालयाच्या प्रलंबित कार्यवाहीला गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

 

कराड सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण

न्यायालयातील तिकीट वितरण सुविधा पुन्हा सुरू

२० वर्षांपासून जीर्ण असलेला प्रवेशद्वार फलक बदलून नवीन बसविणे

२० वर्षांनंतर बार असोसिएशनची अद्ययावत डायरी प्रकाशित

“ओपन डायरेक्ट इंटरॅक्शन” प्रणालीद्वारे सदस्यांशी थेट संवाद

महिला वकीलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध

ई-कोर्ट मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

सदस्यांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून नवीन प्रमाणपत्रे उपलब्ध

पारदर्शक निर्णय प्रक्रियेसाठी नियमित बैठका

 

नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

या सर्व कामांच्या जोरावर ॲड. दीपक थोरात यांनी केवळ प्रशासनिक कार्यक्षमता दाखवली नाही, तर बार बेंच समन्वय मजबूत करत सदस्यांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळेच त्यांचा विजय हा केवळ निवडणूक निकाल नसून, त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे.

 

कराड बार असोसिएशनमध्ये सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होणे ही बाब निश्चितच ऐतिहासिक ठरली आहे. आगामी काळातही ॲड. थोरात यांच्या नेतृत्वाखाली बार असोसिएशन अधिक सक्षम आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!