HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी आता अजून मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ आता 30 जून पर्यंत केली आहे. अतिशय थोड्याच वाहनांना आतापर्यंत HSRP नंबर प्लेट बसवून झाल्याने व ही नंबर प्लेट बसविण्यावरून बरेच वाद झाल्याने ही मुदतवाढ केल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले.

आतापर्यंत अंदाजे 18 लाख वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. 1 एप्रिल 2019 च्या आधीच्या सर्व वाहनांना या नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक आहे तर 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना ते वाहन खरेदी करतानाच त्या सोबत नंबर प्लेट दिल्या आहेत. जर त्यांनाही नवीन HSRP नंबर प्लेट बसवायची असेल तर जुनी HSRP नंबर प्लेट जमा करावी लागेल किंवा ती हरवली अथवा तुटली असल्यास पोलिस स्टेशन मधून त्या संबंधितचे पत्र घ्यावे लागेल.

HSRP नंबर प्लेट चे महाराष्ट्रातील दर

दुचाकी, ट्रॅक्टर – 450 रू

तीन चाकी – 500 रू

चारचाकी, अन्य वाहने – 745 रू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!