दिशा सालीयन हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका ही दिशाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून त्यांची नार्को टेस्ट सुद्धा करण्यात यावी ही मागणी सुद्धा दिशाच्या बाजूने केली जात आहे.
दिशा सालीयन मृत्यू प्रकरणात संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच एन आय ए यासारख्या संस्थांकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे.
आठ जून च्या पार्टीमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे आले तेव्हा तेथील संपूर्ण वातावरणच बदलले त्यामुळे तिचं जिवंत राहणं बऱ्याच लोकांना त्रासदायक होणार होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असा गंभीर आरोप दिशाच्या पालकांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी जो जबाब दिला आहे त्यामध्ये त्यांनी 8 जून 2020 च्या त्या रात्री देशाच्या मालवणी येथे घरात तिच्या मित्रांसोबत एक पार्टी सुरू होती त्यावेळी अचानक तिथे आदित्य ठाकरे व त्यांचा एक अंगरक्षक तसेच सुरज पंचोली व दिनो मोरिया हे सुद्धा हजर झाले व त्यानंतर तिचं जिवंत असणं हे काहीजणांसाठी त्रासदायक होत असल्याने तिला कायमचं शांत केल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांतच सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा रिया चक्रवर्तीशी आदित्य ठाकरे हे 44 वेळा कॉल वर बोलले आहेत असा आरोपही याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

त्यादिवशी आदित्य ठाकरे कुठे होते?
दिशाच्या मृत्यू दिवशी आदित्य ठाकरे उपस्थित होते असा आरोप वारंवारच विरोधकांकडून होत असला तरी आदित्य ठाकरे हे त्यादिवशी रुग्णालयामध्ये होते. तिथे त्यांच्या आजोबांवर म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे वडील यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
