मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या फेलोशिप अंतर्गत 60 पदवीधर युवक-युवतींना 12 महिन्यांसाठी दरमहा 61,500 रुपये (मानधन + प्रवासभत्ता) छात्रवृत्ती देण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया 3 जून 2025 पासून [mahades.maharashtra.gov.in](https://mahades.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.

प्रमुख तपशील:
– मानधन: 56,100 रुपये (मासिक) + 5,400 रुपये प्रवासभत्ता.
– एकूण पदे: 60 (त्यापैकी 20 जागा महिलांसाठी राखीव).
– कार्यक्षेत्र: राज्यातील 20 निवडक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली काम.
– शैक्षणिक अटी: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण), 1 वर्षाचा पूर्णवेळ अनुभव (इंटर्नशिप स्वीकार्य).
– वयोमर्यादा: 21 ते 26 वर्षे.
– निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा (30 गुण), निबंध (20 गुण) आणि मुलाखत (50 गुण).

इतर अटी:
– भाषा कौशल्य: मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आवश्यक.
– प्रशिक्षण: आयआयटी मुंबईद्वारे सार्वजनिक धोरण विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
– बंधने: राजकीय कार्यात सहभाग निषिद्ध, फक्त 8 दिवस रजा, गोपनीयता पालन करणे बंधनकारक.

अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ भेट द्यावे.

 

By admin

2 thoughts on “मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 साठी अर्ज सुरू; महिना 61,500 रु. भेटणार छत्रवृत्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!