नागपूर: नागपूर दंगलीतील प्रमुख आरोपी असलेल्या फहीम खान याच्यासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. फईम खानचे मालेगाव कनेक्शन आता समोर आले असून तो गेल्या पाच महिन्यापूर्वी मालेगावला जाऊन आल्याचे निदर्शनास आले आहे.
नागपूर दंगली मध्ये कारणीभूत ठरलेले 172 व्हिडिओ सापडले आहेत व हे सापडलेले व्हिडिओ बांगलादेश व इतर देशातील IP ऍड्रेस वरून हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले त्यामुळे पोलीस आता या सर्व व्हिडिओंचा IP ऍड्रेस व त्यांचे मोबाईल नंबर या सर्वांचा शोध घेत आहेत.
दुसरीकडून मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी यांचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी या दंगलीत त्यांच्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या कोणत्याही अध्यक्षाचा किंवा पार्टीचा कसलाही संबंध नसल्याचा दावा करत फाईन खानचा बचाव केला असून औरंगजेब अखंड भारताचा निर्माता होता असा दावा पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी केला आहे.
