नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी असलेले सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी त्यांचे उपोषण सोडले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सूप पाजून त्यांचे उपोषण सोडवले. याप्रसंगी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो देखील उपस्थित होत्या.

गुरुवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आणि नीट पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाई होईल, असा संदेश दिला. त्यानंतर काहीच मिनिटात सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचे वृत्त आले.

काय म्हणाले वांगचुक?

उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक X पोस्ट करत म्हणाले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह तसेच लडाखच्या अपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर २६ दिवसांचे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा उपोषण सोडण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी केली होती. विविध अटींवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या चर्चेत मान्य झालेल्या अटींचा सविस्तर खुलासा मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे करणार आहे. दरम्यान, कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन मी करतो, असेही वांगचुक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमके कोणते आश्वासन?

सरकारने वांगचूक यांना आश्वासन दिले आहे की, शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. तसेच सरकार शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यास तयार आहे आणि त्यावर संसदेत चर्चा केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सरकार मदत करेल, अशी ग्वाहीही जे. पी. नड्डा यांनी दिली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!