मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही राज्यातच मराठी भाषेचा निरादर होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अलीकडेच वर्सोवा (अंधेरी पश्चिम) येथील डी मार्टमध्ये एका कर्मचाऱ्याने मराठी ग्राहकाशी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरून वाद निर्माण केला.

 

घटनेत, डी मार्टच्या एका कर्मचाऱ्याने मराठी ग्राहकाला “मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार. तुला काय करायचं ते कर” अशी अभद्र भाषा वापरली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) च्या कार्यकर्त्यांनी दुकानात जाऊन कर्मचाऱ्याला सज्जड शिक्षा दिली. सुरुवातीला कर्मचाऱ्याने माफी मागण्यास नकार दिला, परंतु मनसे कार्यकर्त्यांच्या दबावानंतर त्याने “मराठी भाषेचा अपमान करणार नाही” असे म्हणत क्षमा मागितली.

 

एअरटेल गॅलरीमध्येही मराठी विरोधी वृत्ती  

या आधी, मुंबईतील एअरटेल गॅलरीमध्ये एका हिंदी कर्मचाऱ्याने “क्यू मराठी आणा चाहिए? हम हिंदुस्थान में रहते हैं” अशी टिप्पणी करून मराठी ग्राहकाला हलकेपणाने वागवले होते. हा व्हिडिओो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मराठी भाषेच्या सम्मानासाठी चर्चा सुरू झाली.

 

“आपल्याच घरात हाल सोसते मराठी”  

महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, मराठी भाषकांना हिंदी, गुजराती किंवा इतर भाषा लादण्याचे प्रकार वाढत आहेत. परप्रांतीय लोकांकडून मराठी भाषेचा निरादर केला जात असल्याचे आरोप आहेत. “आपल्याच घरात हाल सोसते मराठी” या वाक्यप्रचाराला अनुसरून मराठी भाषेच्या प्रतिष्ठेसाठी संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!