होळकर घराण्याच्या वंशजांनी वाघ्याच्या समाधीसंबंधीची ऐतिहासिक भूमिका नोंदवली ती पुढील प्रमाणे
– ‘वाघ्या’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा,अशी वदंता
– 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, वाघ्याचं चितेत उडी देऊन बलिदान अशी वदंता
– समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात,समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी
– स्मारक ऐतिहासिक नव्हे, तर लोकश्रद्धेचे प्रतीक?
– यापूर्वीही, 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला
– भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतीही पुरावे नाहीत
तपशील:
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीराखा कुत्रा ‘वाघ्या’ याच्या समाधीला लेखी इतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट होत असताना, या विवादात इंदूरच्या होळकर घराण्याचे नावही समोर आले आहे. वाघ्याने शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चित्तेत उडी घेतली, अशी लोककथा प्रचलित असून, समाधीची प्रत्यक्ष उभारणी २०व्या शतकात झाली. होळकर वंशजांनी स्पष्ट केले की, प्रिन्स तुकोजी होळकरांनी या समाधीसाठी निधी पुरवला होता, परंतु ती ‘ऐतिहासिक’ नसून लोकश्रद्धेचे प्रतीक आहे.
याउलट, संभाजी भिडे यांसारख्या गटांनी वाघ्याचा ऐतिहासिक संदर्भ असल्याचे पुरावे देण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला १ मेपर्यंत समाधीचा पुतळा हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. २०११ मध्ये याच पुतळ्यावर हल्ला झाला होता.
पार्श्वभूमी:
भारतीय पुरातत्व विभाग (ASI) म्हणते की, वाघ्याबाबत कोणतेही प्रमाणित दस्तऐवज उपलब्ध नाहीत. विद्वानांच्या मते, ‘औरंगजेबाची कबर’ किंवा ‘वाघ्याची समाधी’ यासारख्या विषयांना राजकीय रंग देण्यात येत आहे, तर राज्यातील जनतेशी निगडित प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत.
राज्य सरकार या विवादावर कोणता निर्णय घेते आणि संघटनांच्या अल्टिमेटमला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे बाकी आहे.
