पुणे: स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडेवर तिसऱ्यांदा बलात्कार केल्याची तक्रार केली असून, त्याचबरोबर पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले आहेत.

घटनेचा पुन्हा भीषण आढावा

२६ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडेने तरुणीवर बलात्कार केला. घटनेनंतर ७५ तासांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने दोनदा बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा लैंगिक हिंसाचाराचा प्रयत्न केला, पण तिने जोरदार विरोध केल्यामुळे तो पळून गेला.

 

पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप

पीडित तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत:

– पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची संमती न घेता तिची चाचणी केली.

– पोलिसांनी तिच्या पसंतीचा वकील (असीम सरोदे) न नियुक्त करता दुसरा वकील दिला.

– अनेक पुरुष पोलिस अधिकाऱ्यांसमोर तिला घटना सांगावी लागली, ज्यामुळे तिला मानसिक त्रास झाला.

– पोलिसांनी तिला “एक दिवस उशीर झाला” असे सांगून तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

 

 

 

 

मी जीव वाचवण्यावर भर दिला” – पीडितेचा भावनिक आवाहन

 

पत्रात पीडितेने सांगितले की, घटनेच्या वेळी तिने आरडाओरडा केला, पण आवाज खोल गेला. तिने म्हटले, “माझ्या मनात बलात्कार झालेल्या इतर मुली विरोध केल्यामुळे मारल्या गेल्याचे उदाहरणं आली. मी जीव वाचवण्यावर भर दिला.”

 

आरोपी पोलिस ताब्यात, पण न्यायाची मागणी

 

सध्या आरोपी दत्तात्रय गाडे पोलिस ताब्यात आहे. पीडितेच्या आरोपांनंतर प्रकरणातील पोलिस आणि वैद्यकीय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तिने न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणि संवेदनशील वागणूक मागितली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!