बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी 146 जागांवर भरती जाहीर केली आहे. यामध्ये डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर, प्रायव्हेट बँकर, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, प्रोडक्ट हेड आणि पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट यासारख्या पदांचा समावेश आहे.

 

सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. अनुभवाच्या बाबतीत पदानुसार वेगवेगळ्या अटी आहेत. उदाहरणार्थ, डेप्युटी डिफेन्स बँकिंग एडवाइजर पदासाठी भारतीय सैन्यातील कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर निवृत्त झालेले अधिकारी पात्र असतील. तर इतर पदांसाठी 1 ते 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा पदानुसार ठरवण्यात आली आहे. 1 मार्च 2025 पर्यंत, एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे वयमर्यादेत सवलत मिळेल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर ऑनलाइन अर्ज सबमिट करावेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!