मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 284 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दहावी (माध्यमिक शिक्षण) उत्तीर्ण असलेले 18 ते 38 वर्षे वयोगटातील तरुण या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षे सवलत देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा:
– अर्ज सुरु: 22 एप्रिल 2025
– अर्जाची शेवटची तारीख: 10 मे 2025
– फक्त ऑनलाइन अर्जच मान्य
पात्रता आणि वेतन:
– शैक्षणिक पात्रता: 10वी पास (माध्यमिक शिक्षण)
– वेतनमान: ₹15,000 ते ₹47,600(मासिक) + भत्ते
परीक्षा शुल्क:
– सर्वसाधारण: ₹1000/-
– मागासवर्ग/अनाथ: ₹900/-
– माजी सैनिक/दिव्यांग: शुल्क माफ
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सविस्तर जाहिरात वाचून, ऑनलाइन फॉर्म भरावे. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज मान्य होणार नाहीत.
निवड प्रक्रिया:
जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि इतर पात्रता चाचण्यांनंतर केली जाईल. अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर जाहिरात डाउनलोड करावी.
टीप: ही भरती राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी उत्तम संधी आहे. मर्यादित मुदतीत अर्ज करण्याची शिफारस शासनाकडून करण्यात आली आहे.
#महाराष्ट्रशासन #शिपाईभरती #10वीपासनोकरी #NondaniMudrankBharti2025
