दिल्ली : देशभरातील तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये मोठ्या प्रमाणावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण ९१९५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सुरक्षा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना २० एप्रिल २०२६ पासून अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹२१,७०० ते ₹६९,१०० दरम्यान मासिक वेतन मिळणार आहे. तसेच सरकारी नोकरीसोबत इतर भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rect.crpf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, पात्रता अटी आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (Physical Test), वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांमधून पार पडण्याची शक्यता आहे. अंतिम निवड गुणवत्ता आणि पात्रतेनुसार केली जाईल.
महत्त्वाचे म्हणजे, या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते. त्यामुळे देशसेवेची तयारी असलेले उमेदवार या संधीचा नक्की लाभ घ्यावा.
👉 सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका, आजच अर्ज करा!
