प्रतिनिधी : देशातील आघाडीची रिटेल चेन असलेल्या D-Mart मध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शहरांसह उपनगरांमध्ये नव्या D-Mart स्टोअर्सची संख्या झपाट्याने वाढत असल्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दैनंदिन जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या D-Mart मध्ये ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कर्मचारी संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विक्री, कॅशियर, ग्राहक सेवा, स्टोअर सहाय्यक तसेच सुपरवायझर आदी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जात आहे.

 

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. विविध पदांनुसार कमाल वयोमर्यादा साधारणपणे 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र, काही वरिष्ठ पदांसाठी ही मर्यादा अधिक असू शकते.

 

शैक्षणिक पात्रतेबाबत दहावी, बारावी तसेच पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार त्यांना संबंधित पदांवर नियुक्त केले जाते. रिटेल क्षेत्रातील अनुभव नसलेल्या उमेदवारांनाही काही पदांसाठी संधी दिली जात असल्याने प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठीही ही चांगली संधी मानली जात आहे.

 

अर्ज कसा कराल?

D-Mart मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. इच्छुक उमेदवारांनी जवळच्या D-Mart स्टोअरला भेट देऊन आपला बायोडेटा सादर करू शकतात. तसेच D-Mart च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

 

अर्ज करताना आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संपर्क क्रमांक यांसारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

रोजगाराच्या शोधात असलेल्या महिला आणि युवकांसाठी D-Mart मधील ही भरती प्रक्रिया महत्त्वाची संधी ठरत असून इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!