कोल्राहापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज सकाळी सात वाजता ईडी अधिकारी दाखल झाले होते. तेव्हापासून ईडी अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या पुण्यातील कंपनीत देखील धाड टाकली. अतिशय वेगाने सगळ्या घडामोडी सुरु होत्या. गेल्या बारा तासांपासून ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. अखेर बारा तासांनंतर ईडी अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल (Kagal) येथील घराबाहेर पडले आहेत. ईडी अधिकारी गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घरात सकाळपासून काय-काय घडलं याची माहिती दिली.

“आम्ही चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलंय. सकाळपासून जी कार्यकर्ते थांबली आहेत त्यांचे आभार मानतो. चौकशीला आम्ही उत्तर दिलेलं आहे”, असं नाविद मुश्रीफ यांनी सांगितलं.

“हे तर राजकीय होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले. त्याला आम्ही सक्षमपणे उत्तर दिले. सकाळी सात वाजता आले होते. साहेबांशी बोलणं झालेलं नाही”, अशी माहिती त्यांनी दिली.

“जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही”, असं नाविद यावेळी ठामपणाने म्हणाले.

“अधिकारी त्यांचे काम करत होते. त्यांना वरुन फोन येत होते. त्या पद्धतीने ते काम करत होते. जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. आमच्या कार्यकर्त्यांना ते चार दिवसांपासून सांगत होते. काहीतरी होईल, असं बोलत होते. वरचे कोण आहेत ते नेमकं माहिती नाही”, असं नाविद म्हणाले.

सलग बारा तासांपासून चौकशी सुरु असताना आज संध्याकाली ईडीचा आणखी एक अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी आणखी किती वेळ चालणार हे अस्पष्ट होतं. ईडीच्या अधिकाऱ्यांची सकाळी सात वाजेपासून कारवाई सुरु केली होती.

ईडी अधिकाऱ्यांनी आज हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील ब्रिस्क कंपनीत देखील धाड टाकली. अखेर अनेक तासांच्या चौकशीनंतर आता संध्याकाळी ईडी अधिकारी कंपनीच्या बाहेर पडताना दिसले. पण हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची चौकशी सुरुच होती.

ईडीचा आणखी एक अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरात जाताना दिसला होता. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी आणखी वेळ चालेल? याबाबत काही अस्पष्टता होती. अखेर संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ईडी अधिकारी मुश्रीफांच्या घराबाहेर पडले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!