पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना उघड झालीय. आजोबाने आपल्या ११ वर्षीय नातीवर जे केले ते पाहून आता नात्यांवर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न पालकांना पडू शकतो. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी त्या नराधाम आजोबाला बेड्या ठोकल्या आहे.

पीडित मुलगी ४ थी मध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत शाळेतील बॅड टच आणि गुड टच म्हणजेच समुपदेशनाचा कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी सगळ्या विद्यार्थीनी आपआपले प्रसंग सांगत होत्या. एका मुलीने तिचे सख्ये आजोबा तिच्यासोबत कसे घाणरडे वर्तन करत होते, ते सांगितले. यावेळी शिक्षिकेलाही हादरा बसला. त्या मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार सांगितला. “जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.आजोबा आधी अश्लील व्हिडिओ दाखवत होते. त्यावेळी मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे.

समूपदेशन वर्गातून प्रकार उघड

पुण्यातील अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी समुपदेशनाचा वर्ग घेतला जात आहे. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतलाय. मानसशास्त्रज्ञ किंवा एखादे डाँक्टर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यावेळी विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच याची देखील माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!