त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील पिंडीवर बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 ला व्हायरल झाला होता. हे सत्य पडताळणीसाठी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार बनावट असल्याचे समोर आले आहे. यानंतर तत्कालीन अधिकारी रश्वी जाधव यांनी 8 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. पुजारी सुशांत, उल्हास आणि आकाश तुंगार यांच्यावर बर्फ पिंडीवर ठेवून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
