नंदुरबार: येथे दोन दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेला तीन दिवस होत नाही त्यातच अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला दिवस गेलेत. पोट दुखण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता पित्याचे काळे कारनामे उघडकीस आले. त्यामुळे हतबल आईने आपल्या पती विरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ संशयितास ताब्यात घेतले. नंदुरबारच्या घटना प्रकाशा येथे घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील ४० वर्षीय पित्याने एप्रिल २०२४ ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या मुलीने वडिलांच्या अत्याचार सहन केला.

मात्र, पोट दुखत असल्याने तिच्या आईने जेव्हा तिला दवाखान्यात नेले, तेव्हा ही भयानक घटना उघडकीस आली. त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे आई हादरली. तिने आपल्या मुलीसह शहादा पोलिस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला.

आईच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात पॉस्को कायद्या अंतर्गत तसेच भादवि ३७६, ३७६ (२) (एफ), (एन), ५०६ व लैगिंक अपराधा पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ (२), ५ (एन) (एल) ८, १ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी पित्यास ताब्यात घेतले आहे.

सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!