जुन्नर: किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला आहे. शिवजयंती निमित्त आज शिवनेरीवर मोठी भक्तांची गर्दी आहे. यावेळी मधमाशांनी हल्ला केला, यामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गडावर प्रवेश बंद केला आहे. दरम्यान, काल देखील शिवनेरी गडावर शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला होता, यामध्ये देखील अनेकजण जखमी झाले होते.
