पुणे: जैन फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि साह्य निर्मित अजित पाटील एंटरटेनमेंट “प्रेमोदय” चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतचं लाँच करण्यात आले आहे.
अनुभवी लेखक दिग्दर्शक अजित दिलीप पाटील हे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत तर जैन फिल्म प्रोडक्शन यांचा दिग्दर्शक अजित पाटील यांच्याबरोबर हा पहिलाच प्रोजेक्ट असणार आहे. चित्रपटाचा पोस्टर बघून हा चित्रपट पिरॉडिक असेल अस दिसतंय. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये जुन्या काळातील सायकल तसेच दोन चित्रपटांचे पोस्टरही दिसतात ते पण जुन्या काळातील ( आर्या आणी तेरे नाम ) आणि वरती भिंतीवर लिहिलेली एक प्रेम ओळ या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.
दिग्दर्शक अजित पाटील यांच्याशी बोलताना ते म्हणाले, या चित्रपटांमध्ये मराठीतील तीन ते चार ओळखीचे चेहरे यामध्ये दिसतील आणी ते या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. या चित्रपटामध्ये तीन गाणी असून या गाण्याला संगीतबद्ध दिग्दर्शक अजित पाटील यांनीच केल आहे. चित्रपट जरी प्रेम कथेवर आधारित असला तरी याच्यातील प्रसंग, कथा आणि बाकी अशा गोष्टी आहेत ज्या 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या माणसांचं मन आणी विचार दोन्हीना विचार करायला लावू शकतात कि हे आम्ही काय पाहिलं? हे तर आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडलंय आणी हे काही तरी वेगळं आहे.
या चित्रपटाचे संपूर्ण शूट सांगली आणि पुणे तसेच गोवा या भागात होणार आहे. या चित्रपटांमध्ये नवीन कलाकारांना भरपूर प्रमाणावरती संधी देण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट येणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करता 7 देशांमध्ये पाठवण्यात येणार आहे. दिग्दर्शक अजित पाटील यांना विचारण्यात आला की ही रियल लाईफ स्टोरी आहे का? त्यावरती दिग्दर्शक अजित पाटील यांनी मौन बाळगलं आणि काही न बोलण्यास नकार दिला.
गोल्ड स्टेकरचे सर्वेसर्वा आणि डी ओ पी, साईनाथ माने हे या चित्रपाटाच्या सिनेमोटोग्रफीची जबाबदारी हाताळत आहेत. तसेच असोसिएट दिग्दर्शक म्हणून प्रसाद सातवळेकर हे बाजू सांभाळणार आहेत. ताज स्टुडिओ (तन्वीर सय्यद ) हे पोस्ट प्रोडक्शन विभागावरती काम करतील. चित्रपट 2025 च्या शेवटी किंवा 2026 मध्ये प्रदर्शित करण्याचा दिग्दर्शकांचा मानस आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तसेच प्रोडक्शन हेड म्हणून अमित पाटील या चित्रपटाची बाजू हातळणार आहेत.
पुढे लेखक दिग्दर्शक अजित पाटील असेही म्हणाले कि मराठीमध्ये तेच तेच विषय येत असल्याने मराठीचे प्रेक्षक त्यांना कंटाळले आहेत. प्रेक्षकांना नवीन विषय आणि नवीन संकल्पना बघायला आवडते. इतर भाषिक चित्रपट त्यांच्या लोकांना ते देतात तर आपणही आपल्या मराठी लोकांना का देऊ नये? मराठी प्रेक्षकांना जर तुम्ही ते दिलं तर ते नक्कीच चित्रपटाला डोक्यावरती घेतात.
‘प्रेमोदय’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रिलीज करणार आहोत त्यामुळे या चित्रपटाद्वारे महाराष्ट्राची भाषा,संस्कृती,संगीत, पेहेराव आणी गावं हे देशभर पोहचतील यात शंकाच नाही.
खूप छान
चला काय तरी नवीन येतेय. शुभेच्छा 👍🏻
ब्राम्हो. लवकरात लवकर रिलीज होऊदे. शुभेच्छा
Looking different 👍🏻 best luck team.
पोस्टर भारी वाटतोय .! आम्हाला कामं मिळेल कां यात.👍🏻👌🏻❤️
राहुल मिसाळ, पुणे
ब्राम्हो. लवकरात लवकर रिलीज होऊदे. शुभेच्छा