नागपूर: येथे औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला. त्यातील एका गटाकडून जाळपोळ व दगडफेक करण्यात आली. या प्रकारात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांकडून दोन्ही जमावावरती लाठी चार्ज करण्यात आला. दगडफेकीनंतर जवळपास अर्धी ट्रॉली दगड गोळा करण्यात आले. यामध्ये जवळपास 40 पोलीस जखमी झाल्याची वृत्त आहे त्यामुळे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्ताचा तैनात केला असून रात्रीपासूनच पोलिसांचे कॉम्बिग ऑपरेशन सुरू झाले आहे. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 50 लोकांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!