पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका दर्जेदार आणि आशयघन चित्रपटाची भर पडणार असून, लेखक, दिग्दर्शक तथा संगीत दिग्दर्शक अजित दिलीप पाटील यांच्या बहुचर्चित ‘प्रेमोदय’ या आगामी चित्रपटाचा शुभारंभ पुण्यातील प्रसिद्ध डॉन स्टुडिओ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात एका विशेष आणि हटके गाण्याच्या ध्वनिमुद्रणाने करण्यात आली. या गाण्याबाबत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली असून, ते प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. किरणजी कुमावत यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच मा. श्री. संतोष किसनराव गायकवाड, मा. श्री. विशाल भरत परदेशी, व मा. श्री. सुरज पांडुरंग परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, (श. प. महाराष्ट्र) प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच पीपल्स पीआर मीडिया सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा मा. श्री. सागरराज बोदगिरे यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक जगजीत सिंग यांनीही उपस्थिती लावत चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. चित्रपटाच्या तांत्रिक टीमसह रोहित औटे, प्रसाद सातवळेकर, तीर्थ शिंदे आणि स्वानंद शेकडे हे उपस्थित होते. विशेष गाण्याला सुरेल स्वर देण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका राखी यांचीही उपस्थिती होती.

श्री. अमित पाटील (सोशल मीडिया महामित्र, महाराष्ट्र शासन पुरस्कृत तथा मुख्य संपादक, युग आरंभ न्यूज) यांनीही चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महामित्र चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे मान्यवर सदस्यही उपस्थित होते.
चित्रपटातील हे गाणे नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन साकारण्यात येत असल्याने ते प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. शुभारंभाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाविषयी निर्माण झालेली उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना लेखक, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक अजित दिलीप पाटील यांनी, “‘प्रेमोदय’ची कथा, संगीत आणि मांडणी प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करेल,” असा विश्वास व्यक्त केला.
लवकरच या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण पुणे तसेच सांगली जिल्ह्यातील कुंडल आणि परिसरात सुरू होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे ‘प्रेमोदय’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरत असून, मराठी चित्रपटप्रेमींमध्ये त्याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
