सांगली: एम. के. प्रॉडक्शन प्रस्तुत आणि एस. मुस्कान निर्मित ‘दैवंम’ या आगामी मराठी चित्रपटासाठी नवोदित कलाकारांचा शोध सुरू आहे. यासाठी सांगलीत एका भव्य ऑडिशनचे आयोजन करण्यात आले असून, अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अजित दिलीप पाटील करत आहेत.
स्थानिक तसेच राज्यभरातील नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीत हक्काचे व्यासपीठ मिळावे, या मुख्य उद्देशाने या ऑडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रपटातील मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका आणि बालकलाकार अशा विविध पात्रांसाठी निवड चाचणी घेतली जाणार आहे. अभिनयाची आवड असणाऱ्या आणि स्वतःमधील कलागुण जगासमोर आणू इच्छिणाऱ्या नवोदित (Freshers) कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्मिती संस्थेने केले आहे.
ऑडिशनचा तपशील खालीलप्रमाणे:
तारीख: शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:००
स्थळ: शिवशक्ती व्यायाम मंडळ हॉल, त्रिकोणी बागेजवळ, डॉमिनोज पिझ्झाच्या पाठीमागे, सांगली.
इच्छुक कलाकारांनी ऑडिशनसाठी आवश्यक त्या तयारीनिशी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
आकाश शिंदे (प्रोडक्शन ॲडमिन हेड) – ९९७०९३७२९२
महावीर चंदनशिवे – ७८८७७८२८०२
