कलकत्ता: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलचं नाव समोर येतं. बॉलीवूड कलाकारांच्या झगमगटात आणि थाटात आज आयपीएलच्या 18 व्या हंगामाची दमदार सुरुवात कलकत्ता येथे होणार आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम असून यामधील पहिला सामना हा आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना कोलकत्ता मधील ईडन गार्डन वरती खेळला जाईल व सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. सामन्यावरती पावसाचे सावट अतिशय दाट असल्याने सामना होतो की नाही याविषयी साशंकता आहे.

काय सांगतात आकडे?

आत्तापर्यंत आरसीबी आणि केकेआर मध्ये 34 सामने खेळले गेले आहेत ज्यामध्ये वीस सामन्यात केकेआर ने बाजी मारली असून फक्त 14 सामन्यातच आरसीबी ला विजय मिळवता आला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर हा आरसीबीचा राहिला आहे. फक्त 49 मध्ये त्यांचा संघ गारद झाला होता आणि तोही केकेआर विरुद्धच. आज होणारा सामना हा इतर सामन्यांप्रमाणेच हाय व्होल्टेज ड्रामा दाखवणारच सामना असेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!