मेटा (Meta) या कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इंस्टाग्राम आणि फेसबूक येथे आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगभरातील हजारो वापरकर्त्यांनी या ऍप्समध्ये होत असलेल्या त्रुटींबाबत तक्रार केली आहे.

नेमकं काय झालं?

– इंस्टाग्राम आणि फेसबूकवर पोस्ट अपलोड करणे अशक्य झाले आहे.

– इंस्टाग्रामवर कमेंट्स सेक्शन बंद असल्याचे दिसून येत आहे, वापरकर्त्यांना टिप्पण्या लिहिता येत नाहीत.

– काही वापरकर्त्यांना असे वाटले की त्यांच्या खात्याला ब्लॉक करण्यात आले आहे, परंतु ही समस्या सर्वत्र आहे.

– अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (Twitter) वर या समस्येबाबत पोस्ट्स केल्या आहेत.

मेटाकडून प्रतिसाद अजून नाही

अधिकृतपणे मेटा कंपनीकडून या समस्येबाबत कोणताही बयब अद्याप आला नाही. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, ही समस्या सर्व्हर डाऊनशी संबंधित असावी.

वापरकर्त्यांना सध्या थोडा संयम बाळगावा लागत आहे, अशी अपेक्षा आहे की लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!