म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी येऊन गेलेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. म्यानमारच्या जुंटा सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या भूकंपात 1000 पेक्षा जास्त लोक ठार झाले, तर 2,376 जण जखमी आहेत.

 

म्यानमारमधील परिस्थिती

– भूकंपाचे केंद्र मांडले शहराजवळ (राजधानी नायपिडॉपासून ~100 किमी उत्तर) होते.

– मांडालेमध्ये 694, नायपिडॉमध्ये 94, क्युक्सेमध्ये 30 आणि सागाईंगमध्ये 18 मृत्यू.

– इरावजी नदीवरील पूल कोसळला, रस्त्यांना भेगा पडल्या.

– भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर (अमेरिकन सर्वे) तर चीनच्या मते 7.9

– केंद्रबिंदू जमिनीखाली 10 ते 30 किमी खोलीवर होता.

 

थायलंडवर परिणाम  

– बँकॉकमध्ये (म्यानमारपासून ~1000 किमी दूर) तीव्र झटके जाणवले; अनेक इमारतींमधून लोक सुटका करताना दिसले.

– एका इमारतीच्या स्विमिंग पूलात उंच लाटा निर्माण झाल्या.

– बांधकाम चालू असलेली इमारत कोसळली, अनेक ढिगाऱ्याखाली अडकले.

 

भूकंपाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

– म्यानमारच्या सागँग फॉल्ट मुळे येथे भूकंपाचा धोका जास्त. 1930-1956 दरम्यान येथे 7+ तीव्रतेचे 6 भूकंप झाले.

– थायलंड भूकंप-संवेदनशील नसले तरी, बँकॉकच्या इमारती भूकंपरोधी नसल्याने नुकसान झाले.

 

सध्या उपचार आणि बचावकार्यासाठी स्थानिक प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!