सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे’ निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यशस्वी स्थाने पटकावली आहेत.

 

चौथीच्या विद्यार्थ्यांचे यश

– पियूष लाड (नेरूर शिरस जिल्हा परिषद शाळा) याने २८४ गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले.

– वृंदा आवडण (आरोंदा मानसी जिल्हा परिषद शाळा) हिने २८० गुणांसह द्वितीय स्थान मिळवले.

– देवेन पाटील (फोंडा नंबर १ शाळा) याने २७६ गुणांसह तृतीय स्थान मिळवले.

 

सातवीच्या विद्यार्थ्यांचे यश

– विराज कल्याणकर (कणकवली नंबर ३ जिल्हा परिषद शाळा) याने २५८ गुणांसह प्रथम स्थान मिळवले.

– वैदेही फोंडके (विद्या मंदिर हेत शाळा) हिने २४२ गुणांसह द्वितीय स्थान पटकावले.

– ओम भणगे (घोडगेवाडी जिल्हा परिषद शाळा) याने २४० गुणांसह तृतीय स्थान मिळवले.

 

 

या सर्व विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी अभिनंदन केले.

 

या परीक्षेद्वारे जिल्ह्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होणाऱ्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!