कराड : इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर, सनराईज क्लबला मा. डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांनी भेट दिली. क्लबच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण झाल्याने यावर्षीचा थीमही ‘पाचव्या वर्षाची यशोगाथा’ असा ठेवण्यात आला होता. या औचित्याने क्लब सदस्यांनी उत्साहात डीसी मॅडमचे स्वागत केले.

 

प्रेसिडेंट छाया शेवाळे यांनी स्वागतपर भाषणात, गेल्या पाच वर्षांत क्लबला लाभलेल्या सर्व डिस्ट्रिक्ट चेअरमनचे मार्गदर्शन, तसेच त्यांनी दिलेल्या दिशादर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मंगलमय औक्षणाने डॉ. आशा देशपांडे यांचे स्वागत करण्यात आले.

 

भेटीदरम्यान डॉ. देशपांडे यांनी क्लबचे सर्व अहवाल नीट तपासले. योग्य ठिकाणी केलेल्या कामांचे कौतुक केले, तर काही ठिकाणी सुधारणा कशी करता येईल आणि ती का गरजेची आहे याबाबत स्पष्ट मार्गदर्शनही दिले.

 

जनरल मीटिंगमध्ये त्यांनी क्लबचे स्तर, कामकाज, तसेच पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सर्व सदस्यांना सोप्या शब्दांत माहिती दिली. त्यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वामुळे ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 

डीसी मॅडमच्या स्वागतासाठी खास दांडिया सादर करण्यात आला, तसेच क्लब सदस्यांनी स्त्रीजीवनावर आधारित नृत्यही सादर केले. या सादरीकरणामुळे नवरात्रीपूर्वीच स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा झाल्याचे वातावरण निर्माण झाले.

 

इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर, सनराईज क्लबची ही डीसी व्हिजिट यशस्वीरीत्या संपन्न झाली असून, सर्व सदस्यांना प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!