मुंबई: बहुचर्चित असलेल्या शाहरुख-दीपिका यांचा ‘पठाण’ हा चित्रपट विविध गोष्टींनी सध्या चर्चेत आहे. सध्या ‘बेशर्म रंग’ या गाण्याने वादात असलेल्या पठाण चे दुसरे गाणे ‘झुमे जो पठाण’ या गाण्याने अर्ध्या तासातच युट्युबवर १ मिलियन व्ह्युव्ज चा विक्रम केला तर अमेझॉन प्राईम ने चित्रपटाचे OTT चे प्रसारण हक्क तब्बल २०० कोटींना घेतले व पठाण ने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.
चित्रपटाला विरोध करत प्रदर्शित होऊ न देण्याच्या धमकीनंतरही चित्रपटाला लोकांची जोरदार पसंती मिळत असल्याचे समोर येत आहे. आताच जाहीर झालेल्या जगातील सर्वश्रेष्ठ ५० कलाकारांमध्ये शाहरुखचे नांव सामील झाले तर कातर मध्ये झालेल्या फुटबॉल वल्ड कप च्या अंतिम सामन्याच्या आधी दीपिका पदुकोन च्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण झाले त्यामुळे ‘पठाण’ चा जोर वाढल्याचेच समजलं जातंय.
