मुंबई: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट 2023 मध्ये तब्बल 10 हजार नोक-या कमी करणार आहे. अर्थात कंपनीतील 10 हजार कर्मचा-यांच्या डोक्यावर यावर्षी टांगती तलवार असणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील कर्मचा-यांची कपात करणार आहे. मात्र, नेमक्या कोणत्या विभागातील कर्मचा-यांना नोकरी गमवावी लागेल याबाबत कोणतीही माहिती मायक्रोसॉफ्टने दिली नाही.
मायक्रोसॉफ्ट कॉर्पने बुधवारी सांगितले की, ते आर्थिक वर्ष 2023 च्या तिस-या तिमाहीच्या अखेरीस 10 हजार नोक-या कमी करणार आहे. याबाबत बोलताना मायक्रोसॉफ्टने सांगितले की यूएस तंत्रज्ञान क्षेत्रात कंपन्या आर्थिक मंदीचा सामना करत असताना टाळेबंदीचा वेग वाढला आहे.
मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे टाळेबंदीमुळे आर्थिक वर्ष 2023 च्या दुस-या तिमाहीत $1.2 अब्ज शुल्क आकारले जाईल. याचा नकारात्मक प्रभाव मायक्रोसॉफ्टच्या शोअरवर राहणार आहे. हा प्रभाव प्रति शेअर नफ्यावर 12 सेंट इतका असणार आहे.
