2 तासांत भूकंपाचे पुन्हा 5 झटके…5000
तुर्की आणि सिरीयामध्ये सोमवारी भूकंपाचे 3 मोठे धक्के बसले. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून मृतांचा आकडा 5 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता तुर्कीत आज दुपारी 12 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत 5 भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हेने (युएसजीएस) दिली आहे. या सर्व भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 पेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे.

बायकोशी वाद झाल्याने नवाजुद्दीन घराबाहेर
नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याची पत्नी आलिया यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु आहे. त्यामुळे नवाजुद्दीन घराबाहेर पडला असून तो मुंबईतल्या हाटेलमध्ये राहत आहे. हा वाद वकिलांद्वारे जोपर्यंत मिटवला जात नाही, तोपर्यंत नवाजुद्दीन हॉटेलमध्येच राहणार आहे. नवाजुद्दीनच्या आईने आलियाविरुद्ध संपत्तीवरून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर आलियाला नवाजुद्दीनचे कुटुंबिय त्रास देत असल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे.
सर्वात तेजस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नताशा जगातील सर्वात तेजस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत
भारतीय वंशाच्या नताशा पेरियानयागम हीचे नाव शी आले आहे. जगभरातील 76 देशांमधील 15,300 विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत नताशाने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. अमेरिकेतील जॉन्स होपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथने ही परीक्षा घेेली होती. सलग दुसऱ्यांदा नताशाचे नाव तेजस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत आले आहे. 13 वर्षीय नताशा न्यूज्सीतील शाळेत शिक्षण घेत आहे.
(सौजन्य:वे2न्युज)
