मायक्रो ब्लागिंग प्लॅटफार्म ट्विटरने भारतात अखेर ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरु केली आहे. त्यानुसार भारतात आता वेब युजर्सला टविटर ब्लू टिकसाठी 650 रुपये शुल्क महिन्याला द्यावे लागणार आहे. तर मोबाईल युजर्सना ब्लू टिक हवी असेल तर त्यांच्याकडून 900 रुपये महिना शुल्क आकारले जाणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर हा बदल करण्यात आला.
(सौजन्य:वे2न्युज)
