सुरत: युट्यूब व्हिडीओ हे कमाईचं उत्तम साधन आहे. जर तुम्ही युट्यूबवर प्रसिद्ध झालात तर तुम्ही दर महिना लाखो रुपयांची कमाई करू शकता. देशभरात असे कितीतरी युट्यूबर्स आहेत ज्यांच्याकडे एकेकाळी खायला धड अन्न नव्हतं. पण आज ते लाखो रुपयांच्या गाड्यांमधून फिरताहेत. एखाद्या सेलिब्रिटी सारखं आयुष्य जगताहेत. पण ही प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी मेहनत देखील तितकीच करावी लागते. अन् या मिळणाऱ्या पैशांची सुरूवात होते ती तुमच्याकडे कोणतं प्ले बटण आहे? होय, तुमच्या व्हिडीओला दर महिन्याला किती व्ह्यूज मिळतात यावरून युट्यूब तुम्हाला सिलव्हर, गोल्ड किंवा प्लॅटीनम अशी तीन प्रकारची प्ले बटण बक्षिस म्हणून देतं. आणि ज्यांच्याकडे ही बटणं असतात त्यांना अर्थातच चांगले व्ह्यूज मिळतात आणि पुढे या व्ह्यूजच्या माध्यमातून पैसे देखील मिळतात.

पण गुजरातमधील एका व्यापाऱ्यानं युट्यूबच्या या बटनांवर एक भन्नाट हॅक शोधून काढला आहे. तो ही बटणं आपल्या कारखान्यातच तयार करतोय. होय, विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणताहेत, “हा व्हिडीओ चुकूनही युट्यूबच्या CEO ला दाखवू नका. बिचारा चक्कर येऊन खाली पडेल.”

जेव्हा तुमच्या युट्यूब चॅनेलवर १ लाख सबस्क्राईबर्स होतात तेव्हा तुम्हाला युट्यूबतर्फे बक्षिस म्हणून सिलव्हर प्ले बटण मिळतं. पण ज्या युट्यूबर्सला १ लाख सबस्क्राईबर्स गोळा करणं शक्य होत नाही. पण त्यांना चमकोगीरीसाठी जर युट्यूबचं प्ले बटण हवं असेल तर हा गुजरातमधील व्यापारी त्यांना हवं ते बटण तयार करून देतोय. बरं, हे प्ले बटण दिसायला इतकं हुबेहुब आहे की समान्य माणसाला कळणारच नाही ते फेक आहे की खरं. शिवाय त्यावर तुमचं नाव देखील छापून दिलं जातं त्यामुळे मग शंका वगैरे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Source: मटा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!