हिंगोली: जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. संजीवनी अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 13,900 महिला कॅन्सरसंदर्भात संशयित असल्याचे निष्कर्ष लक्षात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख महिलांच्या तपासणीतून ही माहिती सामने आली आहे.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की, संशयित महिलांवर लवकरच उपचार सुरू करण्यात येणार आहेत. त्यांनी या आजाराच्या निदान आणि उपचारासाठी सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण, धोक्याची सूचना
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने हे सर्वेक्षण गेल्या काही महिन्यांत केले होते. त्यातून महिलांमधील स्तन कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर यासारख्या प्रकारांच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनुसार, यापैकी अनेक महिलांना लवकर निदान झाल्यास त्यांचे उपचार यशस्वी होऊ शकतात.
आरोग्य जागरूकतेची गरज
हिंगोलीसारख्या ग्रामीण भागात महिला आरोग्याविषयी जागरूकता कमी असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराची लक्षणे लवकर ओळखणे आणि तपासणी करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी आणखीन मोहिमा हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे.
फक्त एका हिंगोली जिल्ह्यांमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर सुदृश्य महिला निदर्शनास आल्या असतील तर महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर ठिकाणीही हा आकडा नक्कीच छोटा असेल असे म्हणता येणार नाही त्यामुळे प्रत्येकानेच त्यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष किंवा लहान मुले या सर्वांनीच स्वतःची संपूर्ण शारीरिक तपासणी करून घेणे अत्यावश्यक बनले आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पुढील कार्ययोजना
– संशयित महिलांसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करणे.
– कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक ते सुविधा उपलब्ध करून देणे.
– ग्रामीण भागात आरोग्य जागृती कार्यक्रम राबविणे.
हिंगोली जिल्ह्यातील ही माहिती निश्चितच धक्कादायक आहे, परंतु योग्य वेळी उपचार सुरू होण्यामुळे अनेक महिलांचे जीवन वाचवणे शक्य आहे. स्थानिक आरोग्य विभाग आणि प्रशासन यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले जाते.
