कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कराड शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले आणि मित्र समूह यांच्या वतीने ‘कराड दक्षिण श्री २०२५’ ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा कराड येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कुटुंब प्रमुख डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बुधवार पेठ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धांनी उत्कृष्ट कामगिरी सादर करून प्रेक्षकांचे भरपूर कौतुक मिळवले.
स्पर्धेतील विजेत्यांची यादी:
1. अभिजीत पाडळे
2. विक्रम कारंडे
3. रामा मैनाक
4. सुरज निवसे
5. राकेश साळुंखे
6. ओम शिंदे
7. राजेंद्र यादव
8. अनिश शेख
9. करण जाधव
10. लक्ष्मण सोळंके
11. सुयश आचा
12. सिद्धेश पवार
13. गौरव उंबरकर
14. रेहान शेख
15. कार्तिक काजले
16. मोहस मनेर
17. श्री शिंदे
18. कृष्णा पडळकर
19. रविराज सुतार
20. सत्यम कचरे
या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वांना अभिनंदन!
विशेष पुरस्कार
स्पर्धेदरम्यान मोस्ट मस्क्युलर (सर्वाधिक स्नायूयुक्त) आणि पब्लिक डिमांड (प्रेक्षकांचा आवडता) या विशेष श्रेणींमध्ये सुद्धा स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
निष्पक्ष निर्णय
स्पर्धेच्या निर्णायक मंडळामध्ये राजेंद्र हेंद्रे, मुरलीवत्स, नितीन माने, अमोल ननवरे, धनंजय चौगुले, उमेश मोहटकर, कडणे सर, अपूर्वा यांनी सहभागी स्पर्धकांचे मूल्यमापन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या संघटनकर्त्यांनी सर्व सहभागींना आभार व्यक्त केले. स्पर्धेच्या निकालानंतर विजेत्या स्पर्धकांचे सन्मान करण्यात आले.
