मराठी अभिनेता सागर कारंडे सायबर गुन्ह्याचा बळी ठरल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव अक्षयकुमार गोपलन असे असून त्याने कारंडेसह अनेकांना फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सागर कारंडे यांना एका महिलेने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून इन्स्टाग्राम पेज लाईक करण्याबद्दल पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला लाईक केल्याबद्दल काही रक्कम मिळाल्याने कारंडे यांनी विश्वास ठेवला. नंतर त्यांना ‘एक लाईक करा, पैसे कमवा’ या स्कीमअंतर्गत ६१ लाख ८३ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. पैसे परत न मिळाल्याने कारंडे यांनी पोलिसांकडे तक्राद केली.
पोलिसांच्या तपासात आढळले की, आरोपी अक्षयकुमारने क्रिप्टोकरन्सीतून ही रक्कम हस्तांतरित केली होती. याशिवाय यापूर्वीही त्याने अनेकांना फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे करत असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिस चौकशी करीत असून, आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही शोध घेत आहेत. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याची गरज पोलिसांनी पुन्हा एकदा नोंदवली आहे.