मुंबई: दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले यांना “महाराष्ट्र अभिमान पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील समाजसेवा, नागरिक सुरक्षा आणि पोलीस-जनतेच्या सहकार्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला. मुंबईतील लोढा इस्टेट क्लब हाऊसमध्ये झालेल्या भव्य पुरस्कारवितरण समारंभात त्यांना गौरवचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन सत्कारण्यात आले.

 

भोसले यांनी दीर्घकाळापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी, पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून जनजागृती आणि शिस्त निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दक्ष नागरिक पोलिस मित्र संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभावी कामगिरी बजावली आहे.

 

भोसले यांना या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांना भोसले यांच्या या सन्मानामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे.

 

या प्रसंगी मान्यवर उपस्थितींमध्ये कर्नल रवींद्र त्रिपाठी, माजी पोलीस कमिशनर सीताराम न्यायनिर्घुने, माजी महापौर बाबूभाई भावनजी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी नाईक यांनी भोसले यांचा गौरव केला. पुरस्कार स्वीकारताना भोसले यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांचे तसेच नागरिकांचे आभार मानले आणि समाजहितासाठी अधिक कार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

हा पुरस्कार मिळाल्याने राजेश भोसले यांच्या समाजसेवेच्या ध्यासाला आणखी चालना मिळणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!