कराड : शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक भव्य दरबार मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून तात्पुरते वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, कृष्णा सर्कल ते पांढरीचा मारुती मंदीर-जोतिबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-दर्गा मोहल्ला-चावडी चौक-नेहरू चौक-आझाद चौक-यशवंत हायस्कूल-दत्त चौक या संपूर्ण मार्गावर सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांना रस्त्यावर पार्किंग करण्यास किंवा वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 

दत्त चौक-यशवंत हायस्कूल-आझाद चौक-चावडी चौक-प्रिती संगम घाट-जोतिबा मंदिर या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून संबंधित वाहनांना आझाद चौक-सात शहीद चौक-जनकल्याण बँक या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

 

आझाद चौक-नेहरू चौक-चावडी चौक-प्रितीसंगम घाट या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठीही वाहतूक बदल लागू करण्यात आला असून ही वाहने आझाद चौक-सात शहीद चौक-जनकल्याण बँक या मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

 

चावडी चौक-कमानी मारुती मंदीर-जोतिबा मंदीर-कृष्णा सर्कल या मार्गावर मिरवणूक चावडी चौकापासून पुढे जाईपर्यंत सर्वसाधारण वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

 

सैदापूर कॅनॉल-विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड-दत्त चौक-कोल्हापूर नाका या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक बदल करण्यात आला असून ही वाहने सैदापूर कॅनॉल-विजय दिवस चौक-एस.टी. स्टॅण्ड टी पॉईंट-भेदा चौक-पोपट भाई पेट्रोल पंप-कोल्हापूर नाका या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

 

पाटण तिकाटणे-दैत्य निवारणी-शाहू चौक-दत्त चौक-आझाद चौक-चावडी चौक या मार्गाने येणाऱ्या वाहनांना दत्त चौकापासून पुढे चावडी चौक-नागोबा मंदिर या मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली असून संबंधित वाहनांना अजंठा चौक-पोपट भाई पेट्रोल पंप-भेदा चौक-विजय दिवस चौक या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

 

सैदापूर कॅनॉल-कृष्णा सर्कल-नागोबा मंदिर-जोतिबा मंदिर-कमानी मारूती मंदिर-चावडी चौक-आझाद चौक-दत्त चौक या संपूर्ण मार्गावर मिरवणूक सुरू होऊन पूर्ण होईपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून केवळ रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

 

सदर वाहतूक बदल हे केवळ तात्पुरत्या स्वरूपात 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 14.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत किंवा मिरवणूक पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!