कुंडल: स्वातंत्र्यवीर माणिकराव पवार (पाटील) यांच्या जयंतीनिमित्त कुंडल येथे मोफत शासकीय कागदपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर मा. प्रकाश (बाळासाहेब) पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

मुख्य अतिथी व उपस्थिती

शिबीराला मा. प्रकाश (बाळासाहेब) पवार (चेअरमन, एम.पी.एस.सी बँक कुंडल), तलाठी श्री. एस.एस. रेड्डी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. व्ही. व्हाय पवार, मा. सर्जेराव पवार, मा. उत्तमराव पवार, मा. पंजाबराव पवार, मा. बाजीराव पवार, उपसरपंच श्री. हिम्मत पवार, मा. बापूसाहेब पवार, मा. संजय पवार, शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष हंबीराव पवार, विक्रम पाटील, मा. नितीन आवटे, मा. हर्षल पवार, मा. अविनाश जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, मनसे), मा. अतुल तातुगडे (सचिव, पलूस ता. मनसे), मा. अभिजित पवार, मा. अतुल पवार, मा. सुजित पवार, मा. अशोक निकम, श्री. भगवान पवार, मा. अमोल पवार, श्री. शिवाजी पवार, मा. विपुल निकम, मा. रवींद्र जाधव, श्री. राजेश साळुंखे यांनी सहभाग घेतला.

 

३९० लोकांना मिळाला शिबिराचा लाभ..

या शिबिरातर्फे अनेक शासकीय सेवा व कागदपत्रे नागरिकांना मोफत पुरवण्यात आली. त्यांतर्गत:
– जातीचे दाखले प्रस्ताव : २०
– उत्पन्न दाखले : ७०
– डोमिसाइल : ७५
– आयडी कार्ड साइज फोटो : ४०
– पॅन कार्ड : ४५
– पासपोर्ट : १८
– आयुष्मान भारत कार्ड : ५६
– बांधकाम कामगार नोंदणी : ३५
– मोटार विमा : २१
– आरोग्य विमा : १५
– अल्पभूधारक दाखले : १०
– आधार कार्ड मोबाइल लिंक : २५
– LIC विमा : ३५

अशा प्रकारे एकूण ३९० नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळाला.

 

मित्रपरिवारचे आयोजन

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. विशाल पाटील (पवार) मित्रपरिवार यांनी केले. स्वातंत्र्यवीर माणिकराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजहितासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल सर्वांनी कौतुक व्यक्त केले.

शिबीरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले व अधिक अशा शिबिरांची मागणी केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!