नवी दिल्ली: सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुलासाठी पात्रता निकष सुलभ केले आहेत. यामुळे आता अधिक गरजू आणि गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ मिळू शकेल. पूर्वी १३ निकषांपैकी आता फक्त १० निकष लागू राहतील, तर उत्पन्न मर्यादा १५,००० रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

कोणते निकष रद्द झाले?  

यापूर्वी खालील ३ अटींमुळे अनेक लोक योजनेपासून वंचित राहत होते, परंतु आता हे निकष काढून टाकण्यात आले आहेत:

1. मासेमारीसाठी होडी किंवा दुचाकी वाहन असणे

2. वीज कनेक्शन नसणे

3. घरात गॅस चूल नसणे

 

नवीन निकषांमुळे कोणाला फायदा?

– गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उत्पन्न मर्यादा वाढली.

– वाहने किंवा होडी असलेले कुटुंब आता पात्र.

– सामाजिक-आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक संधी.

 

सर्वेक्षणाची अंतिम तारीख वाढवली  

ज्यांना यापूर्वी सामाजिक-आर्थिक जनगणना (२०११) मध्ये सहभागी होता आले नाही, त्यांना आता १५ मे पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

 

या बदलांमुळे PMAY-G योजना अधिक समावेशक बनली आहे आणि ग्रामीण भागातील अधिक लोकांना स्वत:चे घर बांधण्यासाठी सरकारी अनुदान मिळेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!