मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे.

पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!